ब्रॉयलर चिकन धोकादायक ? - माझी मायबोली मराठी //]]>

Latest

Monday, 6 July 2026

ब्रॉयलर चिकन धोकादायक ?

 ⏹️  ब्रॉयलर चिकन धोकादायक

Boiler Chicken


जीमला जाणारी किंवा मांसाहार प्रिय असणारी लोकं प्रोटीन्स जास्त मिळवण्यासाठी ब्रॉयलर चिकन खातात. या प्रकराच्या चिकनची कशी वाढ होते, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. ब्रॉयलर कोंबड्यांची वाढ वेगाने होण्यासाठी त्यांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर रसायनं आणि अँटीबायोटीक्स यांचा समावेश केला जातो. त्यामुळे फक्त ४० दिवसातच त्यांची वाढ होते. त्यामुळं कृत्रिम पद्धतीनं वाढवलेल्या कोंबड्यांचं मांस आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जर तुम्ही वारंवार याचं सेवन करत असाल तर याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.


१) कॅन्सरचा धोका : जर पोल्ट्रीशी संबंधित पदार्थ सातत्यानं खाल्ले तर कॅन्सरचा धोका वाढतो. ब्रॉयलर चिकन उच्च तापमानाला शिजवल्यानंतर हा कॅन्सरचा धोका वाढतो. विशेष बाब अशी की, यात पुरुषांना कॅन्सरचा धोका जास्त असतो. अलीकडे ग्रिल्ड चिकन आवडीनं खाल्लं जातं. यानेही आरोग्याला धोका निर्माण होतो.


२) बॅक्टेरिया : आपल्याकडे बहुतांश पोल्ट्री फार्म आणि चिकन यात स्वच्छतेचे नियम पाळले जात नाहीत. याचा परिणाम सेवन करत असलेल्या चिकनवर होतो. त्यामुळं त्यातील बॅक्टेरियामुळे काही किरकोळ आजार होण्याचा धोका असतो.


३) सिगारेट पेक्षाही धोकादायक : ब्रॉयलर चिकनचा एक लेगपीस ६० सिगारेट पेक्षाही धोकादायक असू शकतो. मुळात चिकन जास्त शिजवल्यामुळं त्यातील प्रोटीनची मात्रा कमी होते. त्यामुळं ते हानिकारक ठरतं.


४) फॅट्स : शरीराला फॅट्सची गरज असते, परंतु गुड फॅट्सची. ब्रॉयलर चिकन मधून जे फॅट्स मिळतात ते बॅड फॅट्स असतात. हेच कारण आहे की, जे सतत ब्रॉयलर चिकनचे पदार्थ खातात त्यांना लठ्ठपणा, उच्च रक्तदाब अशा आरोग्याच्या तक्रारी वाढतात. त्यामुळं ब्रॉयलर चिकन ऐवजी गावरान चिकन खाणे, अधिक योग्य आहे.


५) हानिकारक केमिकल्स : वजनावर चांगला दर मिळावा आणि वेगानं वाढ व्हावी यासाठी ब्रॉयलर कोंबड्यांना आहारा सोबत इंजेक्शन्स दिले जातात. त्यामुळं त्यांच्या शरीरात अनेक हानिकारक केमिकल्स इंजेक्ट होतात. अशा कोंबडीचं मांस खाल्लं तर शरीरात केमिकल्सचा प्रवेश होतो. यामुळं लठ्ठपणा, पुरुषात प्रजनन क्षमता कमी होणं, मुलीमध्ये वयात येण्याविषयीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता होते.


६) अँटीबायोटीक्स : ब्रॉयलर चिकनच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर अँटीबायोटीक्स दिली जातात. परिणामी, आठवड्यातून ३ वेळा ब्रॉयलर चिकन खाणं म्हणजे ३ वेळा अँटीबायोटीक्सचं इंजेक्शन टोचून घेतल्या सारखं आहे.


७) पुरुषांवर गंभीर परिणाम : जे सातत्यानं ब्रॉयलर चिकन खातात त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. खास करून प्रजनन क्षमतेवर मोठे परिणाम होतात. त्यात स्पर्म्स म्हणजेच शुक्राणूंची ताकद कमी होण्यासारखा गभीर धोका असतो.

No comments:

Post a Comment