समचरणदृष्टि विटेवरी साजिरी - Samchran Drusti Vithevari Sajiri - माझी मायबोली मराठी //]]>

Latest

Sunday, 26 March 2023

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी - Samchran Drusti Vithevari Sajiri

तुकाराम गाथा

 

मंगलाचरण - अभंग 

 

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥

आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥

ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥

तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥


समचरणदृष्टि विटेवरी साजिरी
Samchran Drusti Vithevari Sajiri

मराठी अर्थ:- 

हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहेत. तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजर्‍या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो ॥१॥

या व्यतिरिक्त देवा मला कोणतेही माइक पदार्थ म्हणजे मायेने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी तृष्णा इच्छा देखील राहू देऊ नका ॥ध्रु.॥

हे देवा ब्रह्मादिक पदे व या सारखे पदे उच्च ठिकाणी माझे मन जडू देऊ नको कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शीराणीचा आहे॥२॥

तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही कर्म धर्म आहे त्याचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे असे की हे सर्वकाही नाशिवंत आहे॥३॥


हिंदी अनुवाद:- 

हे हरि, तेरे पाँव तो ईटों पर भी हैं। आपकी दृष्टि भी वही है, और मेरा भाव आपके ऐसे गंभीर रूप पर स्थिर हो॥१॥

इसके अतिरिक्त प्रभु मुझे कोई भी मिक भोजन अर्थात् माया से युक्त भोजन न करने दें और मेरी तृष्णा को भी उस स्थान पर रहने न दें ॥ध्रु.॥

हे भगवान, मेरे मन को ब्रह्मदिका पदों और इसी तरह के पदों द्वारा उच्च स्थानों पर न लगाने दें, क्योंकि वह पद एक प्रकार से दुःख की शिरानी है॥२॥

तुकाराम महाराज कहते हैं कि अब हम जो भी कर्म धर्म समझते हैं, वह सब अविनाशी है। 3॥


इंग्लिश कीवर्ड:- 

Samchran Drusti Vithevari Sajiri | Tithe Mazi Hari Vruti Raho ||1||

Anik N Lage Mayik Padarth | Thithe Maze Arth Nako Deva ||Dru||

Bramhdik Pade Dukachi Shrani | Thithe Dushit Zani Jodo Desi ||2||

Tuka Mahne Tyaceh Kalale Amha Varm | Je Je Karm Dharm Nashvant ||3||



अभंग अर्थ 


हे विठ्ठला, आपले जे सोजळ रूप आहे, ते खूप सुंदर आहे. असे हे विटेवर उभे असलेल्या आपल्या साजिऱ्या रूपावर माझं मन स्थिर राहू दे. हे आपले रूप माझ्या डोळ्यात, माझ्या मनात साठवून राहू दे.  असे आपले सुंदर रूपाचे दर्शन झाल्यावर मला आजून काही नको, माझी इच्छा, माझी तृष्णा हि पूर्ण पने संपलेली आहे. त्यामुळे मला आता कसल्या हि मोह जळाची इच्छा राहिली नाही. आयुष्यात मला कोठलेही  प्रकारचे उच्च पदे नको, कारण ती आपल्या समोर तुच्छ आहे. अशी ही सर्व पदे  म्हणजे एक प्रकारचे दुःख. त्यामुळे हि सर्व दुःख जर अश्या उच्च पदामुळे मला जर येत असतील तर अश्या ठिकाणी माझे मन लागू देऊ नकोस. मला ह्या सर्व मोह माया पाससून विलिप्त ठेव. दूर ठेव. .तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही कर्म धर्म आहे त्याचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे असे की हे सर्वकाही नाशिवंत आहे. फक्त तुमचे रूप तुमचा सहवासच नश्वर आहे, नाशिवंत आहे.  

 

Translation - Abhang - Samchran Drusti Vithevari Sajiri

O Vitthala, your simple form is very beautiful. Let my mind remain fixed on your holy form standing on this brick. May this form of yours be stored in my eyes, in my mind. After seeing your beautiful form like this, I don't want anything from now on, my desire, my desire is completely gone. So, I no longer have any desire for this temptation. I do not want any kind of high position in life, because it is insignificant in front of me. All these positions are a form of suffering. Therefore, if all these sorrows are coming to me because of such a high position, then do not let my mind apply to such a place. Keep me free from all these delusions. keep away. Tukaram Maharaj says God, whatever Karma Dharma we now understand is that it is all impermanent. Only your form, your association is mortal, imperishable.



No comments:

Post a Comment