थोर संत महाराज - तुकाराम - माझी मायबोली मराठी //]]>

Latest

Sunday, 9 April 2023

थोर संत महाराज - तुकाराम

संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराजांचे मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) होते.  त्यांचा जन्म, दिनांक २१ जानेवारी १६०८ (सोमवारी) माघ शुद्ध पंचमी,  शाहीवाहन शके १५३०, युगाब्द ४७०९ रोजी देहू, महाराष्ट्र येथे  झाला आणि त्यांची निर्वाण (वैकुंठवासी ) १९ मार्च १६५० (शनिवार),फाल्गुन वद्य द्वितीया शाहीवाहन शके १५७२,  युगाब्द ४७५१ रोजी देहू, महाराष्ट्र येथे  झाला. महाराज हे वारकरी संप्रदायतून होते. व्यवसायाने ते वाणी होते पण ते शेती, दुकानदारी व सावकारी करत असत.  तुकोबाराय केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य)(गुरु) यांचे शिष्य होते तर संत निळोबा , संत बहिणाबाई, भगवानबाबा हे तुकोबारायांचे शिष्य होते. 





तुकोबारायांची भाषा मराठी होती. मराठी भाषेतील त्यांची साहित्यरचना "तुकारामाची गाथा" हि सुप्रसिद्ध आहे. वारकरी समाजातले तसेच साहित्य रचनेतील त्यांचे कार्य हे खूप अप्रतिम आहे. तसेच तुकोबाराय हे समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक सुद्धा होते. त्यांच्या वडीलांचे नाव बोल्होबा अंबिले आणि आई चे नांव  कनकाई बोल्होबा आंबिले होते. त्यांच्या पत्नीचे नाव आवली असे होते. तुकोबारायांना ४ आपत्य होती, त्यात ३ मुले आणि १ मुलगी होती. मुलाची नांवे महादेव, विठोबा, नारायण होते तर मुलीचे नाव भागूबाई होते. 


No comments:

Post a Comment