आप्पासाहेब धर्माधिकारी
अप्पासाहेब धर्माधिकारी, ज्यांना दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी म्हणूनही ओळखले जाते, (जन्म 14 मे 1946) हे महाराष्ट्रातील एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते आहेत. अप्पासाहेब धर्माधिकारी हे थोर निरूपणकार कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुत्र. वडिलांकडून त्यांना निरूपणाचा वारसा लाभला आहे.
जीवन परिचय:-
- बालपण
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 14 मे 1951 रोजी रायगड मधील रेवदंडा या ठिकाणी झाला. त्यांचे बालपण ,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रेवदंडा या ठिकाणी झाले.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्रात निरूपण व अनेक सेवाभावी उपक्रम हाती घेतले. गोरगरीब जनता अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता यामध्ये अडकलेली आहे. त्यांना मार्गदर्शन वर्गांची आवश्यकता आहे. यासाठीच त्यांनी प्रबोधन सुरू केले. वडिलांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हे समाजसेवेचे काम आपल्या हाती घेतले. अज्ञानी जनतेला अध्यात्मिक ज्ञान देण्याचे काम नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. आपल्या वडिलांनी सुरू केलेले कार्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुढे चालू ठेवले. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेला कार्याचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला समजेल की त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने का गौरवण्यात आले असावे.
- कार्ये
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल भागामध्ये अनेक तरुण दारूच्या आहारी गेले होते.अशा तरुणांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला. आपल्या वडिलांनी जे समाजसेवेचे व्रत स्वीकारले होते. व्रत पुढे चालू राहावे यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापन केले.या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले.
1. अंधश्रद्धा निर्मूलन
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सर्वात महत्त्वाचे कोणते कार्य केले असेल तर भोळी बाबडी जनता कर्मकांडांमध्ये अडकून होती. विशिष्ट वर्ग त्यांची लूट करत होता. धर्माच्या आणि कर्मकांडाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची होणारी दिशाभूल अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या बैठकांचा माध्यमातून केली.
2. वृक्षारोपण कार्यक्रम
आज निसर्गाचे सर्व संतुलन ढासळलेले आहे.ते संतुलन जर आपल्याला नीट करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.शासन त्यासाठी विविध उपक्रम राबवत असते आणि या उपक्रमांना हातभार लावण्याचे काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान दरवर्षी करताना दिसते. आणि त्या प्रतिष्ठानचे प्रमुख या नात्याने त्याचे सर्व श्रेय अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाते.
3. रोजगार मेळावे
लोकांना रोजगाराच्या संधी कुठे आहेत याची बऱ्याचदा माहिती नसते. माहिती सहजगत्या उपलब्ध व्हावी यासाठी विविध रोजगार मिळावे अप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांची अनुयायी यांनी सुरू केले. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
4. स्वच्छता मोहिम
अलीकडच्या काळात व्यक्तीचे आरोग्य विषयीचे प्रश्न का निर्माण झाले आहेत याचा जर आपण शोध घेतला तर आपल्या आजूबाजूला पसरलेले घाणीचे साम्राज्य. हे साम्राज्य घालवण्यासाठी शासकीय यंत्रणा कमी पडत आहेत. त्यातून लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. यावर तोडगा काय म्हणून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे अनुयायी यांनी अनेक स्वच्छता मोहीम हाती घेतल्या. समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता अशा विविध स्वच्छता मोहिमा यशस्वी करून लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे काम अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.
5. व्यसन मुक्ती केंद्रांची स्थापना
अलीकडच्या काळात ढाबा संस्कृती मोठ्या प्रमाणात फसवताना दिसत आहे. बरेच तरुण-तरुणी शोक म्हणून किंवा आदर्श मजबूर म्हणून वेगवेगळी व्यसना करताना दिसत आहेत. अशा तरुणांना व्यसनाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अनेक ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र उभी केली. अशा या त्यांच्या कार्यामुळेच त्यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
6. आरोग्य शिबिर
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत अनेक आरोग्य शिबिरांच्या आयोजन केले या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आदिवासी भागातील लोकांना आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. जे शिबिराचाच एक भाग म्हणून अनेक रक्तदान शिबिरे देखील आयोजित करण्यात आली.
7. समाज प्रबोधन
समाजाला योग्य दिशा द्यायचे असेल समाजाचे उत्तम प्रबोधन होणे गरजेचे आहे. नेमके हेच कार्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. समाजाला सुयोग्य दिशा दाखवण्याचे काम आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.
8. बाल संस्कार वर्ग
अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मते आपल्याला खूप मोठे बदल हवे असतील तर आपण बालपणापासूनच बालकावरती चांगले संस्कार केले पाहिजेत आणि संस्कार व्हावे त्यासाठीच बाल संस्कार वर्गांच्या आयोजन केले जाते. बाल संस्कार वर्ग अगदी निशुल्क असतात कोणत्याही प्रकारची क्रियांमध्ये आकारले जात नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांना सामावून घ्यायला असे समाजकार्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले मनोज त्यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- पुरस्कार
- अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आतापर्यंत बऱ्याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
- 2014 साली अप्पासाहेबांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
- माजी राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांची राज्याचे स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली होती.तर २०१७ मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री हा नागरी सन्मान देऊन सन्मानित केले.
- युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्युटने अप्पासाहेबांना लिव्हिंग लिजंड पुरस्कार देऊन सन्मानित केले.
- महाराष्ट्र सरकारमार्फत दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक अप्पासाहेब धर्माधिकारी उर्फ दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना जाहीर झाला. त्यांनी केलेल्या अनमोल कार्याचा आपल्याला परिचय व्हावा. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची ख्याती सर्व दूर पसरलेली आहेतर यंदाच्या वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नाव पुरस्कारासाठी जाहीर केले. त्यांचा पुरस्कार सोहळा १६ एप्रिल रोजी, सेंट्रल पार्क नवी मुंबई इथे संपन्न झाला.
- कार्याची सुरवात कशी झाली?
कै. नानासाहेब धर्माधिकारी यांनी यासाठी १९४३ साली श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली. गोरेगाव, मुंबई येथे पहिली श्री समर्थ बैठक सुरू झाली. यानंतर देशाविदेशात श्री समर्थ बैठकांचा विस्तार होत गेला. या बैठकांमधून रामदास स्वामींच्या दासबोधाचे निरूपण केले जाऊ लागले. सोप्या शब्दांत अनुयायी किंवा श्री सदस्यांचे प्रबोधन होऊ लागले. विकारी मनाचे प्रबोधन करून निर्व्यसनी समाज घडविण्याचे काम सुरू झाले. आज देश-विदेशातील लाखो अनुयायी या बैठकांच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. या बैठकांमधून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पश्चात संत शिकवणीतून समाज प्रबोधनाचा हा वारसा अप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे पुत्र सचिनदादा धर्माधिकारी यांनी पुढे सुरू ठेवला आहे.
- कार्याची व्याप्ती कशी वाढली?
श्री समर्थ बैठकातून संत शिकवण देतानाच नैतिकता, निर्भयता, नम्रतेची शिकवण त्यांनी दिली. सामाजिक कार्याची व्यापकता वाढविण्यासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जाऊ लागले. लोकसहभागातून हे उपक्रम राबविले जाऊ लागल्याने त्यांची व्याप्ती वाढत गेली.
वृक्ष लागवडीमध्ये पुढाकार…
हवामानातील बदल आणि त्याचे तापमानावर होणारे परिणाम लक्षात घेऊन वृक्षलागवड करून त्यांची जोपासना करण्याचे कार्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने २०१५ ते २०२१ या कालावधीत एकूण ३६ लाख ६१ हजार ६११ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ३ लाख २१ मनुष्यबळ वापरण्यात आले. या वृक्षांची जोपासनाही श्री सदस्यांकडून केली जात आहे. आंतरिक स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छतेला महत्त्व द्यायला हवे, अशी शिकवण अप्पासाहेबांनी आपल्या अनुयायांना दिली. या शिकवणीतून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता मोहिमेला सुरवात केली. रस्ते, नाले, गाळाने भरलेले तलाव, समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याचे कार्य श्री सदस्यांनी हाती घेतले. गावाच्या वेशीपासून सुरू झालेला हा उपक्रम हळुहळू शहरांच्या चौकाचौकांपर्यंत येऊन पोहोचला. प्रतिष्ठानच्या वतीने आत्तापर्यंत १४० स्वच्छता अभियाने राबविण्यात आली. २० लाख २३ हजार ३६९ श्री सदस्य सहभागी झाले. १ लाख १५ हजार २३ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या शिवाय विहिरीचे पुनर्भरण, जलस्रोतांची स्वच्छता, निर्माल्य संकलनातून खत निर्मितीचे उपक्रम राबविले आहेत. आध्यात्माला सामाजिक उपक्रमांची जोड दिल्याने लाखो अनुयायी त्यांच्या कार्यात जोडले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील त्यांच्या अनुयायांपैकी एक आहेत.
वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी काम केली. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहीम, अनेक व्यसनमुक्ती केंद्र कार्यक्रमांचा आयोजन त्यांनी केले. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ते समाज उपयोगी कार्य करत असतात समाज प्रबोधनही करत आहेत. आप्पासाहेब हे रायगड जिल्ह्यात काम करत असून, ज्येष्ठ निरूपणकार म्हणून त्यांची महाराष्ट्रभरात ख्याती आहे. त्यांचे लाखो अनुयायी आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर एका प्रतिष्ठान तर्फे साधारण औरंगाबाद मध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आला होता या अभियानात तब्बल ७४ लाख स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. तर एकूणच 748 घनटन कचरा हा अभियानातून काढून टाकण्यात आला. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या श्रीमत् दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून लोकांचे निरूपण करण्यासाठी डॉक्टर पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2008 साली त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.अंधश्रद्धा कार्यक्रमाच्या माध्यमातून ते समाज उपयोगी कार्य करत राहिले आणि तसेच त्यांनी समाज प्रबोधन देखील केले. एकंदरीतच सांगायचं झालं तर नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून मिळालेला अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकीचा वसा आप्पासाहेब जगताय जोपासतात आणि वृद्धिंगत करतात. महाराष्ट्रात अनेक वृक्षारोपणाचे रक्तदान शिबिराचा आयोजन करत असतात. वैद्यकीय शिबिर रोजगार मिळावे स्वच्छता मोहीम, अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती केंद्र चालवत राहिले. आदिवासी वाड्यावर त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यक्रम उपक्रम ते राबवत असतात. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवतात त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या म्हणजे त्यांचा समाज प्रबोधन केलं जातं. अधिक प्रमाणात वृक्षारोपण, स्वच्छता दूत म्हणूनही त्यांची ओळख आहे.


No comments:
Post a Comment