शिवमंदिर आर्ट फेस्टिवल - माझी मायबोली मराठी //]]>

Latest

Thursday, 16 March 2023

शिवमंदिर आर्ट फेस्टिवल

अंबरनाथ, भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक.  अंबरेश्वर शिव मंदिर हे  महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक. स्थानिक पातळीवर याला पुरातन शिवालय म्हणून ओळखले जाते. हे शिवमंदिर धार्मिक आणि ऐतिहासिक असे महत्त्वाचे स्थान आहे.


Ambarnath Shiv Mandir

शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हल

अंबरनाथ, गुरुवार, १६ मार्च २०२३ ते १९ मार्च २०२३ रोजी शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. कोविड-१९ मुळे दोन वर्षांपासून खंडित झालेला शिवमंदिर कला महोत्सव यावर्षी १६ मार्चपासून आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली. १६ ते १९ मार्च या चार दिवसांच्या महोत्सवात जगप्रसिद्ध कलाकारांसोबत नृत्य, संगीत आणि शिल्पकलेचा अनुभव घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Shiv Mandir, Ambarnath

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिव मंदिर आर्ट फेस्टिवलला गुरूवार, १६ मार्चपासून सुरूवात होणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथील शिव मंदिरात महाआरती करत याचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात चार दिवस जगविख्यात गायक कलावंत, नामवंत कलावंतांच्या कलाकृतींचे प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, लाईव्ह पेंटींग, पोट्रेट पेंटिंग, शिल्पकला अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.

अगदी अलीकडेच स्थानिक राजकारण्यांनी आयोजित केलेला ‘शिव मंदिर कला महोत्सव’ हा तीन दिवसांचा जल्लोष आहे जो प्राचीन मंदिराची जाणीव करून देणारा आहे आणि कला आणि संस्कृतीने भरलेल्या आपल्या पौराणिक कथांचा फ्लॅशबॅक आहे. बॉलीवूड सेलिब्रिटी आणि गायक देखील साक्षीदार आहेत जे उत्सवात ग्लॅमर घटक जोडतात.

शिव मंदिर आर्ट फेस्टिवल यंदा चार दिवस रंगणार असून पहिल्यांदाच शनिवार १८ आणि रविवार १९ मार्च रोजी संगीत पहाट आयोजित करण्यात आली आहे. १६ मार्चला पहिल्या दिवशी राकेश चौरसिया आणि त्यांचे सहकारी तसेच पंकज उदास यांच्या कार्यक्रमाचे महोत्सवाला सुरूवात होईल. दुसऱ्या दिवशी अमित त्रिवेदी, तर तिसऱ्या दिवशी पहाटे अनुराधा पौडवाल तर सायंकाळी मोहित चौहान आणि रविवारी पहाटे मैथिली ठाकूर आणि सायंकाळी शंकर महादेवन कला सादर करतील. यंदाही दरवर्षीप्रमाणे महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कलादालनात ६० हून अधिक नामवंत कलावंत त्यांच्या उत्तम कलाकृतीं प्रेक्षकांच्या समोर साकारणार आहे. तर काही कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृती कलादालनात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. हे कला प्रदर्शन महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका विनामूल्य असून विविध केंद्रांवर त्या उपलब्ध आहे. शिवमंदिर कला महोत्सवात रसिकांचे लक्ष वेधून घेणारी कलादालन; अभिजात चित्रांना देखण्या कलादालनाचे कोंदण.

या कार्यक्रमाच्या प्रवेशिका विनामूल्य असून विविध केंद्रांवर त्या उपलब्ध आहे.


No comments:

Post a Comment